महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 5, 2021, 8:08 PM IST

ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पालघरमध्ये 'लोकशाही वाचवा' आंदोलन

राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपच्या वतीने पालघर येथील भाजप कार्यालयासमोर लोकशाही वाचवा आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार दोन दिवसांचे विधीमंडळ अधिवेशन बोलवून लोकशाहीची पार थट्टा करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

Legislative assembly BJP agitation Palghar
लोकशाही वाचवा आंदोलन भाजप पालघर

पालघर -राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपच्या वतीने पालघर येथील भाजप कार्यालयासमोर लोकशाही वाचवा आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार दोन दिवसांचे विधीमंडळ अधिवेशन बोलवून लोकशाहीची पार थट्टा करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. पालघरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.

आंदोलनाचे दृश्य

हेही वाचा -वसई-विरारमध्ये विकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन; दुकाने सुरू, नागरिकही रस्त्यावर

आंदोलनात आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे पालघरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२ दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनावरून आंदोलन -

5 जुलैपासून राज्याचे विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांना घटनेने दिलेले अधिकार जसे प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी व्यपगत केले आहेत. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला महाविकास आघाडी सरकार घाबरत आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. दोन दिवसांचे हे अधिवेशन लोकशाहीची क्रूर थट्टा ठरणार असल्याचा आरोप देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा -वसई-विरारमध्ये पेड लसीकरण ड्राइव्ह; १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details