महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची जिल्ह्यात आढावा बैठका सुरू

पालघर जिल्ह्यात आगामी काळात ग्रांमपंचायतीच्या निवडुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, आणि भाजपच्या जिल्हा आढावा बैठका पारपडत आहेत.

BJP, Shiv Sena, NCP start review meetings in Palghar district on the backdrop of Gram Panchayat elections
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची जिल्ह्यात आढावा बैठका सुरू

By

Published : Feb 2, 2021, 7:48 PM IST

पालघर - जिल्ह्यात आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्भूमीवर भाजप आणि शिवसेनेकडून जोरदारपणे ग्रामपंचायत आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बैठकी सत्र सुरू आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी तयार होते की स्वबळाचा नारा आळविला जातोय यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची जिल्ह्यात आढावा बैठका सुरू

पालघर जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत जाहीर झाली. आगामी काळात 300 हुन अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल काही महिन्यात वाजण्याचे संकेत मिळत असल्याने इथल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपकडून हरियाणा राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, आमदार संजय केळकर यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठका घेतल्या. यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी निवडणुकीबाबत कानमंत्र दिला आहे.

भाजप कडून वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन -

वाडा, पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवत गावागावात भाजपने मतदार वाढविण्याकरिता आणि संघटनात्मक बांधणीवर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील आणि जेष्ठ नेते बाबाजी काठोले, सरचिटणीस संतोष जणाठे, सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाने पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भर दिला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समोर महाविकास आघाडीचे आव्हान असले तरी आपण मैदानात मोठ्या ताकदीने ही निवडणूक जिकायची आहे. असे भाजपच्या प्रमुख वरिष्ठ मार्गदर्शकांकडून सूचना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत विजयाची संधी आणि पुढचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. असेही त्यांच्याकडून सूचित केले जात आहे. पालघर जिल्ह्यात भाजपकडे आता एकही आमदार नाही, जिल्हापरिषदमधे ते विरोधी बाकावर आहेत. काही पंचायत समितीत सत्तापदे वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता पदे आहेत. केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना आणि भाजपच संघटनात्मक सांघिक कार्य हे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यशाचं कारण ठरू शकेल असा अंदाज राजकीय तज्ञाकडून व्यक्त केला जातोय.

जिल्ह्यात सेनेकडून तूर्तास स्वबळाची चाचपणी -

जिल्ह्यात शिवसेनेकडून ही आगमी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. डहाणू मधील कासा, मोखाडा, जव्हार याभागात ग्रामपंचायत निवडणुकी विषयी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्यात. शिवसेनेकडून बैठकी सत्र सुरू असून आम्ही स्वबळावर आगामी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतात त्यावर पुढील निर्णय असेल असे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी बोलताना माहिती दिली. शिवसेनेचे जिल्ह्यात एक आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती काही ठिकाणी सत्ता पदे आहेत. शिवाय जिल्ह्याचे शिवसेनेकडे खासदार, पालकमंत्री पद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडे या जमेच्या बाजू आहेत.

राष्ट्रवादीकडे या आहेत जमेच्या बाजू -

आगामी ग्रामपंचायती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीकडून आढावा बैठका सुरू आहेत. मोखाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यात या बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आणि जिल्हापरिषद मध्ये आणि पंचायत समितीत सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील काही भाग शहापूर विधानसभा मतदार संघाशी जोडला गेला आहे. हा मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका या कशा बिनविरोध होतील यावर आमचा प्रयत्न राहील. वाडा तालुक्यात या आगामी ग्रामपंचायत निवडणुका करण्याचा हा प्रयत्न केला जाईल असे एका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील काँग्रेस पक्षही आढावा बैठका सुरू करणार -

काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यात बऱ्यापैकी स्थिती नाही ना आमदार ना खासदार. राज्य सरकारमध्ये घटक पक्ष असल्याने त्यांना या भागात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादनाची चांगली संधी आहे. काँग्रेसकडून अजून बैठका घेण्यात आल्या नाहीत. मात्र, याबाबत जिल्हाध्यक्षांची चर्चा केली असून लवकरच यावर बैठका होणार आहेत. कार्यकर्त्यांची मते जाणून पुढे निर्णय घेण्यात येईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव मनीष गणोरे यांनी दिली. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप शिवाय महाविकास आघाडी तयार होते की, स्वबलाचा नारा दिला जातोय हे आगामी काळातच समजणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details