पालघर- भाजप - शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात भाजपने बडतर्फीची कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर येथील भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्याच गीता जैन यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतद पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर येथील भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन पक्षातून बडतर्फ - gita jain
भाजप - शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात भाजपने बडतर्फीची कारवाई केली आहे.
बडतर्फ उमेदवार गीता जैन
बोईसर मतदारसंघात शिवसेना उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे भाजप बंडखोर, भाजप पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप बंडखोरांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती भाजप कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.