पालघर- महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात वीज बिल माफ करण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात वीजबिल न भरणाऱ्या नागरिकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालघर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पालघर येथील महावितरणच्या कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले, तसेच भजन-कीर्तन करून आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
पालघर; भाजप आंदोलकांनी महाविरतणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे - भाजप आंदोलन पालघर
उर्जामंत्री नितिन राऊत यांनी कोरोना काळात १०० युनिट माफ करणार असे सांगितले होते. मात्र, बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला.उलट वीजबिल न भरणाऱ्या नागरिकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाढीव वीज बिलावर विरोधात भाजपचे आंदोलन
उर्जामंत्री नितिन राऊत यांनी कोरोना काळात १०० युनिट माफ करणार असे आश्वासन दिले होते. मात्र, बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. उलट वीजबिल न भरणाऱ्या नागरिकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ७२ लाख लोकांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका बहुतांश नागरीकांना बसणार आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपने पालघर येथील महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकळे तसेच भजन किर्तन करत महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला.