महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचे पालघर, बोईसर येथे आंदोलन - पालघर भाजप वीजबिल आंदोलन

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून या सरकारला सत्तेच्या जागे करण्यासाठी भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी करत पालघर व बोईसर येथे आंदोलन करण्यात आले.

वीज बिल दरवाढी विरोधात भाजपचे पालघर, बोईसर येथे आंदोलन;  केली वीज बिलांची होळी
वीज बिल दरवाढी विरोधात भाजपचे पालघर, बोईसर येथे आंदोलन; केली वीज बिलांची होळी

By

Published : Nov 23, 2020, 7:54 PM IST

पालघर :महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने, भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालघर व बोईसर येथे महावितरण कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महावितरणने पाठविलेल्या वीजबिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने तात्काळ वीजबिल माफ करावे, अशी मागणी पालघर भाजपच्यावतीने यावेळी करण्यात आली.

कोरोना काळात वाढीव वीजबिल..

कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रिडींग व वीजबिल वाटप केले. कोरोना काळात जनतेची आर्थिक गणिते कोलमडली असताना वाढीव वीज देयके म्हणजे जनतेच्या खिशावर भुर्दंड पडला आहे. एकीकडे जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना जनतेला आर्थिक दिलासा देण्याऐवजी आवाजवी वीज बिल देऊन त्यांची दिशाभूल करीत वीज दरवाढ करीत महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वास घात केला असल्याचा भाजपने केला आहे.

भाजपने केली वीजबिलांची होळी..

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. तसेच या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून या सरकारला सत्तेच्या जागे करण्यासाठी भाजपच्यावतीने वीज बिलांची होळी करत पालघर व बोईसर येथे आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details