पालघर - मीरा भाईंदरमध्ये महापौर निवडणुकीमुळे राजकारण तापले असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला. शहरातील भाजपचे सर्वांत निष्ठावंत नेते असलेल्या नरेंद्र मेहता यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा सर्व पदांचा राजीनामा - narendra mehata bjp leader
मीरा भाईंदरमध्ये महापौर निवडणुकीमुळे राजकारण तापले असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला. शहरातील भाजपचे सर्वांत निष्ठावंत नेते असलेल्या नरेंद्र मेहता यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
हेही वाचा -मीरा भाईंदरमध्ये हेडफोन वापरणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई
राजीनाम्या संदर्भात बोलताना नरेंद्र मेहता यांनी सांगितले की, 11 वर्षांपासून भाजपमध्ये काम केले आहे. या राजकीय कार्यकाळात अनेक उतार चढाव येत गेले. या दरम्यान नगरसेवक, कार्यकर्ता आणि जनतेची चांगली साथ लाभली. मात्र, माझ्या वर्तवणुकीमुळे पक्षााला नुकसान होत होते. माझ्यामुळे माझ्या नेत्यांना झुकावे लागेल. अशी गोष्ट मी कधीच मान्य करू शकत नाही. यामुळे मी माझा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मेहता यांनी सांगितले. दरम्यान, मी यापुढे कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नसून राजकारण ही करणार नसल्याचे मेहता यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांना पराभूत केले होते.