महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये भाजपाची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - palghar latest news

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले आहे. यानंतर आक्रमक होत पालघर मधील हुतात्मा चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

पालघरमध्ये भाजपाची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पालघरमध्ये भाजपाची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By

Published : Mar 21, 2021, 5:16 PM IST

पालघर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले आहे. यानंतर आक्रमक होत पालघर मधील हुतात्मा चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री व महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी करत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पालघरमध्ये भाजपाची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देवून जो धक्कादायक खुलासा केला. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. म्हणूनच सचिन वाझे यांची नियुक्ती करावी असा त्यांचा आग्रह होता. असा खुलासा या पत्राव्दारे केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहे. आरोपाचं पत्र समोर आल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-आसाममध्ये दुसऱ्यांदा बनणार 'डबल इंजिन' सरकार - पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details