पालघर -जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत विक्रमगड मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यात माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांनी बाजी मारली आहे. तर डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पास्कल धनारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी हेही वाचा- काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्या विरोधात माजी पोलीस अधिकारी निवडणूक रिंगणात
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी होती. यात भाजपचे आदिवासी आघाडीचे प्रमुख हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, मधुकर खुताडे आदींची नावे चर्चेत होती. यात हेमंत सावरांनी उमेदवारी मिळविण्यात यश आले आहे. हेमंत सावरा हे अस्थी तज्ञ आहेत. तसेच पक्षीय संघटनेत ते पालघर जिल्हा कमिटीवर कार्यरत आहेत. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री यांनी केलेली विकास कामे यांच्या जोरावर आणि पक्षीय बळावर भाजपकडून ते उमेदवारीसाठी दावा करत होते. हरिश्चंद्र भोये यांचा उमेदवारी मिळवण्यात पुन्हा अपयशी आले आहे.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघाबाबात माजी मंत्री विष्णू सावरा हे तब्यतीमुळे लढणार नाहीत. या मतदारसंघात त्यांचे पुत्र हेमंत सावरा इच्छुक होते. आमदार विष्णू सवरा यांचा राजकीय वारसदार म्हणून हेमंत सावरा हे उमेदवारीमुळे पुढे आले आहेत.
हेही वाचा - भाजपच्या 'या' दिग्गजांना पहिल्या यादीत मिळाले नाही स्थान!