महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Accident : पालघरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 2 जखमी - bike and car accident in jawhar palghar

जव्हार-विक्रमगड राष्ट्रीय मार्गावर अपघात झाला आहे. कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले ( bike and car accident in jawhar palghar ) आहेत.

Accident
Accident

By

Published : Jul 23, 2022, 8:51 PM IST

पालघर - जव्हार-विक्रमगड राष्ट्रीय मार्गावर गुरुवारी ( 21 जुलै ) भरधाव कार व दुचाकीच्यात भीषण अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहे. तर, एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या विलंबामुळे अंत्यसंस्कार उशिरा करण्याची वेळ त्याच्यावर ओढवल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यात घडली ( bike and car accident in jawhar palghar )आहे.

दिपक तुंबडा (वय २२), मयत संदेश वझरे (वय २६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर, योगेश कुवरा याची प्रकृती गंभीर असून, त्याला नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

जव्हारचे बांधकाम व्यावसायिक हर्षद मेघपुरिया हे आपली कार ( एम.एच.48 सी.सी 6493 ) मधून विक्रमगड येथून येत होते. तेव्हा वाळवंडा जवळील डांबर प्लँट जवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील तिसरा व्यक्ती आणि कार चालक जखमी झाले आहेत.


जव्हार पोलिसांनी अपघाताच्या घटनास्थळी पंचनामा करुन मृताच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेतली आहे. त्यानुसार कार चालकावर गुन्हा नोंदवला आहे. जो पर्यंत समोरच्या व्यक्तींवर गुन्हा नोंदविला जात नाही, तो पर्यंत मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने जव्हार पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच, शासकीय पतंगशहा कुटीर रुग्णालयासमोर मृतांच्या नातेवाईकांना ठिय्या मांडला होता.

हेही वाचा -Lightning struck the school : शाळा सुरु असतानाच कोसळली वीज, ३० मुलं जखमी, एक गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details