पालघर: सायकल यात्रेची सुरुवात पंजाब राज्यातील पठाणकोट पासून केल्याचे धीरज कुमार सांगितले. रथ सायकल टूर, हिमाचल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा अशा 25 राज्यात धीरज कुमार भ्रमण करणार आहे. यानंतर ते श्रीलंका व म्यानमार देशातसुद्धा सायकल यात्रा करणार आहेत. त्यांनी सध्या 16 हजार 700 किलोमीटरचा प्रवास केला. मुंबईहून 11मे नंतर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश पुढे जम्मू काश्मीर आणि लेह लडाखला यात्रा समाप्त होणार आहे.
राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे आवाहन:सायकल यात्रेदरम्यान धीरज कुमार अनेक जाती-धर्मांच्या लोकांची भेट घेत आपला समानतेचा संदेश देत आहे. त्यांच्या 18 महिन्यांच्या सायकल प्रवासात त्यांनी आतापर्यंत 16 हजार 700 किमी अंतर कापले आहे. प्रवासादरम्यान त्यांनी संबंधित राज्यातील सुरू असलेली हिंसा टाळण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे आवाहन केले. अनेक तरुणांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बोलून भेदभाव देशात वाढत आहेत. प्रत्येकजण भारतीय असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून या सायकल यात्रेचे आयोजन केले गेले. प्रवासात यश मिळावे यासाठी संबंधित राज्यातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
18 महिन्यांपासून प्रवास:गेल्या जवळपास 18 महिन्यांपासून मी सायकल यात्रा करीत आहे. अनेक राज्यात मला विविध जाती, धर्म, संस्कृती तसेच राहणीमान पद्धती बघायला मिळाल्या. आपल्या राज्यातील आपसातील भेदभाव, हिंसा बंद होऊन एकोपा वाढीस लागला पाहिजेत. यासाठी मी यात्रेच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य देखील मिळत आहे, असे सायकल यात्री धीरज कुमार यांनी सांगितले.