महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी - पालघर येथे बकरी ईद साजरी

आज सोमवारी पालघर जिल्ह्यात सर्वत्र मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करुन अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.

पालघर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी

By

Published : Aug 12, 2019, 7:21 PM IST

पालघर- आज सोमवारी पालघर जिल्ह्यात सर्वत्र मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करुन अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.

पालघर जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी

पालघर, बोईसर, मनोर परिसरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘ईद-उल-अजहा’ सणानिमित्त मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या. मुस्लीम बांधव ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा करण्यासाठी आपापले शहर आणि गावातील ईदगाहवर गोळा झाले. या ठिकाणी शांततेत नमाज पठण करण्यात आल्यानंतर ‘खुतबा-ए-ईद’ अदा करुन विश्वशांतीसाठी मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली.

बोईसर येथील दारुल उलूम गौसिया आणि बोइसर जामा मस्जिद येथे सकाळी 7 आणि 8 वाजता नमाज पठण करुन बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. बोईसर जमा मस्जिद बाहेर सुन्नी मुस्लीम जमातच्या पदाधिकारी मार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, मानसिंह पाटील, कृषि सभापती अशोक वडे, जिल्ह्य परिषद सदस्य रंजना संखे, आरपीआयचे सचिन लोखंडे, महेंद्र भोने, संजय पाटील, श्रमजीवी संघटनाचे दिनेश पवार, भाजप महामंत्री आशाद बी शेख यांच्यासह नागरिकांना, लोकांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details