ठाणे -पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणात तब्बल 228 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर सोमवारी (दि. 7 डिसें.) ठाणे जिल्हा विशेष मॉब लिचिंग न्यायालयाने आणखी 47 आरोपींचा जमीन अर्ज मंजूर केला आहे. यापूर्वी याच न्यायालयाने तब्बल 58 जणांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या 105 वर पोहोचली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 12 आरोपी हे अल्पवयीन होते. तर न्यायालयाने यापूर्वीच हत्येत प्रमुख भूमिका असल्याचा ठपका ठेवत 36 आरोपींचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
ठाणे जिल्हा मॉब लिचिंग विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी 47 आरोपींना 15 हजारांच्या जातमुचलकावर जामीन दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 डिसेंबरला होणार आहे. सोमवारी (दि. 7 डिसें.) न्यायालयात आरोपींच्या वतीने वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते, त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तीवाद करण्यात आला. या झुंडबळी प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे 16 एप्रिल, 2020 ला दाखल करण्यात आले होते.
288 अटकेत 800 लोकांची केली चौकशी