महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार तरे आज बांधणार शिवबंधन; बहुजन विकास आघाडीला पडणार खिंडार? - बोईसर मतदारसंघ बातमी

बविआचे आमदार विलास तरे हे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार, अशी माहिती आगरी सेना नेते जनार्दन पाटील यांनी दिली आहे.

आमदार विलास तरे आणि कार्यकर्ते

By

Published : Aug 25, 2019, 2:32 PM IST

पालघर - बहुजन विकास आघाडीला (बविआ) बोईसर मतदारसंघात खिंडार पडणार आहे. कारण बविआचे आमदार विलास तरे हे आगरी सेना नेते जनार्दन पाटील यांच्यासह मातोश्रीकडे रवाना झाले आहे. ते आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

बविआचे आमदार विलास तरे हे आगरी सेना नेते जनार्दन पाटील यांच्यासह मातोश्रीकडे रवाना

तरे हे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार, अशी माहिती आगरी सेना नेते जनार्दन पाटील यांनी दिली आहे. तरे यांच्या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात बविआला मोठा धक्का बसणार आहे. जिल्ह्यात बविआची मोठी ताकद असल्यामुळे तरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बविआला बोईसर मतदारसंघात खिंडार पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details