पालघर- बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांना सेनेतून बविआत व बविआ मधून सेनेत नेणारे आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांचे आता पालघर जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगरी सेना देणार काँग्रेस, बविआला धक्का, बविआचे नगरसेवक सेनेच्या संपर्कात... - बविआ
बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांना सेनेतून बविआत व बविआ मधून सेनेत नेणारे आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांचे आता पालघर जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

जनार्दन पाटील
आगरी सेना देणार काँग्रेस, बविआला धक्का
सध्या आमदार विलास तरे यांच्या पाठोपाठ बविआचे अनेक नगरसेवक तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एक बडा नेता पाटील यांच्या गळाला लागला असून त्यांना मातोश्रीवर घेवून जाणार असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीने आगरी सेनेचे कार्यालय तोडले होते तेव्हापासून आगरी सेना विरुद्ध बविआ असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्यात बविआला शह देण्यासाठी त्याचे आमदार, नगरसेवक फोडण्यात पाटील यशस्वी झाले असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.