पालघर - जिल्ह्यातील गातेस ते खानिवली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गातेस -खानिवली रस्त्याची खड्ड्यांनी चाळण बनली आहे
रस्ते बांधताना चांगल्या दर्जाचे काम होत नाही. वाडा तालुक्यातील शिरिष फाट्यापासून गातेस गावापर्यंत एक ते दीड किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण बनली आहे. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे प्रवासी वाहतूक करणारे चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा - निर्माल्यापासून मिळवा मोफत खत, ठाण्यातील विवियाना मॉलचा स्तुत्य उपक्रम
रस्त्यावर खड्डे पडले की, तो तात्पुरता दुरूस्त केला जातो. मात्र, चांगल्या प्रतीचे काम होत नाही. परिणामी, रस्त्याची स्थिती पुन्हा आहे तशीच होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार यातून दिसतो. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. गाडीमध्ये बसलेले प्रवासीही चिडचिड करतात, अशी खंत प्रवाशी वाहतूकदार व्यक्त करत आहेत.