पालघर -अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरी पालघर शहरातील रस्त्यांची दुरवस्था जैसे थे आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते पूर्ववत होतील, असा गणेशभक्तांना विश्वास वाटत होता. मात्र, असे काही झाले नाही व खड्ड्यांतून गणपतीचे आगमण करण्याची वेळ गणेश भक्तांवर आली आहे.
हेही वाचा - 'बॉर्डरचा बाप्पा' काश्मीरवासीयांसोबत मुंबईतून रवाना
गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वच गणेश मंडळांमध्ये व घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पालघर शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांची चाळण झालेली आहे. नगरपरिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. यामुळे गणेशाच्या आगमनात खड्यांचे विघ्न येणार असेच चित्र सध्या रस्त्याच्या दुरवस्थेवरून स्पष्ट होत आहे.