महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारमध्ये सापडले कचराकुंडीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक

विरारमध्ये कचराकुंडीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले आहे. विरारच्या उपजिल्हा रूग्णालयात या बाळावर उपचार सुरू आहेत.

कचराकुंडीत सापडलेले बाळ

By

Published : Oct 3, 2019, 9:20 PM IST

Updated : Oct 3, 2019, 9:30 PM IST

पालघर -विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथे कचराकुंडीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले. या बाळावर विरारच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरारमध्ये कचराकुंडीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले

बुधवारी दुपारी नारिंगी बायपास रोडवर एका कचराकुंडीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. रस्त्यावरील प्रवाशांनी कचराकुंडीत डोकावले असता, गोणीमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. स्वाती सोलापूरकर व सुनील खानोलकर यांनी या मुलीला कचराकुंडीतून उचलून विरारच्या उपजिल्हा रूग्णालयात नेले.

हेही वाचा - विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलीस बंदोबस्तात एनओसी

सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. स्त्री जातीचे अर्भक कचराकुंडीत फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.

Last Updated : Oct 3, 2019, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details