पालघर - उमेद अभियान अंतर्गत माऊली महिला ग्रामसंघातील महिलांनी 'माझे कुटुंब, माझी जवाबदारी' या शासनाच्या उपक्रमात भाग घेत कोरोनविरुद्धच्या लढाईत आपले ही योगदान असावे या हेतूने बोईसर भीमनगर परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करत पथनाट्यदेखील सादर करण्यात आले. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना कोरोनाविषयी मार्गदर्शन केले.
पालघरमध्ये उमेद अभियानाअंतर्गत महिलांची कोरोना विषयी जनजागृती रॅली - पालघर महिलांची कोरोनाविषयी जनजागृती रॅली बातमी
आरोग्य तपासणी आणि त्वरित उपचाराने कोरोनावर सहज मात करू शकतो. नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू केलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, त्याच वेळी कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नसल्याने नागरिकांनी दैनंदिन जीवनात नवीन बदलांचा स्वीकार करणे क्रमप्राप्त झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी तसेच नवीन जीवनशैली अंगीकारण्याबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे.
कोरोना हा आजार संसर्गजन्य असून तो एका व्यक्ती पासून दुसऱ्यांना लगेच होतो. परंतू योग्य वेळी आरोग्य तपासणी आणि त्वरित उपचाराने कोरोनावर सहज मात करू शकतो. नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले.