पालघर - विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग (अंध-अपंग) मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी डहाणू येथे हे शिबीर पार पडले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.
पालघरमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी जनजागृती शिबीर - maharastra assembly election 2019 news
पालघर जिल्ह्यात अंध आणि अपंगांसाठी कार्यरत असलेल्या वंदे मातरम् अंध अपंग सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून या जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या नोडल प्रमुख माणिक दिवे यांनी दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळी अडचणी येऊ नयेत म्हणून मतदारांशी संपर्क साधला.

हेही वाचा-बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केलेली 'लुंगी' नेसून आदित्यचा वरळीत प्रचार
पालघर जिल्ह्यात अंध आणि अपंगांसाठी कार्यरत असलेल्या वंदे मातरम् अंध अपंग सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून या जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या नोडल प्रमुख माणिक दिवे यांनी दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळी अडचणी येऊ नयेत म्हणून मतदारांशी संपर्क साधला. त्यांना मतदान प्रकिये विषयी माहिती दिली. प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दिव्यांग मतदारांना वाहतूक व्यवस्था, ब्रेल लिपी, व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डहाणूचे गटविकास अधिकारी गटविकासाधिकारी भारक्षे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या जनजागृती शिबिरात प्रकल्प संचालक तथा स्वीप नोडल प्रमुख माणिक दिवे, डहाणूचे प्रांत अधिकारी तथा डहाणू विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी सौरभ कटियार, डहाणू निवडणुक नायब तहसीलदार मा. श्रीकांत कवळे, स्वीपचे सहाय्यक हेमंत अंधारे, समन्वयक आनंद जाधव, वंदे मातरम् अंध अपंग सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत, सचिव नीता, तामोरे सल्लागार प्रमोद पाटील, यांच्यासह डहाणू व तलासरी तालुक्यातील दिव्यांग मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
TAGGED:
डाॅ. कैलास शिंदे पालघर बातमी