महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदाराच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून फसवणुकीचा प्रयत्न - online fraud

विधान परिषेदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले. या फेक अकाऊंटमध्ये अॅड केलेल्या फ्रेंड लिस्टमधील विविध व्यक्तींना मेसेज करून ऑनलाइन पद्धतीने पैसे खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली.

Fraud by creating a fake Facebook account
फेक फेसबुक अकाउंट बनवून फसवणुक

By

Published : Oct 24, 2020, 1:22 PM IST

पालघर -माजी आमदारच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या नावाने हे फेक अकाऊंट तयार करण्यात आले. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात आनंद ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे.

विधान परिषेदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केले. या फेक अकाऊंटमध्ये अॅड केलेल्या फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींना मेसेज करून ऑनलाइन पद्धतीने पैसे खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. यातील बहुतांश व्यक्ती हे माजी आमदारांच्या ओळखीचे असल्याने मेसेज आल्यानंतर त्यांनी आनंद ठाकूर यांना संपर्क केला.

मेसेज आल्यास प्रतिसाद न देण्याचे आवाहन

आपण कोणाकडेही अशा प्रकारे मेसेज करून पैसे मागितलेले नाहीत. मेसेज आल्यास प्रतिसाद न देण्याचे आवाहन आनंद ठाकूर यांनी केले.हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details