मुंबई - आज दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वराज एक्सप्रेसच्या ( Swaraj Express Washroom Girl ) वॉशरुमध्ये एका 20 वर्षीय मुलीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघकीस आली आहे. त्यामुळे 1 वाजेच्या सुमारास डहाणू रेल्वेस्थानकावर ( Dahanu Railway Station ) ही गाडी थांबवण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली आहे.
Swaraj Express : स्वराज एक्सप्रेसच्या वॉशरुमध्ये 20 वर्षीय मुलीचा गळफास घेण्याचा प्रयत्न - स्वराज एक्सप्रेस मुलगी गळफास बातमी
आज दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वराज एक्सप्रेसच्या ( Swaraj Express Washroom Girl ) वॉशरुमध्ये एका 20 वर्षीय मुलीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघकीस आली आहे. त्यामुळे 1 वाजेच्या सुमारास डहाणू रेल्वेस्थानकावर ( Dahanu Railway Station ) ही गाडी थांबवण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली आहे.

Swaraj Express News
स्वराज एक्सप्रेसमध्ये एक 20 वर्षीय मुलगी वॉशरुमध्ये गेली होती. बराच वेळ बाहेर न आल्याने प्रवाशांनी या बाबतची माहिती रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी कुंडी उघडली असता, मुलीच्या गळ्यात कापड बांधले होते. त्यानंतर तत्काळ या मुलीला डहाणून कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली आहे.