पालघर - कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पालघर जिल्ह्यातील ‘तारापूर अणुऊर्जा प्रकल्प’ देखील पुढे सरसावला आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातर्फे कोरोनाविरुद्ध लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाख 36 हजार 808 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडून 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा - कोरोना अपडेट्स बातमी
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातर्फे कोरोनाविरुद्ध लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाख 36 हजार 808 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, या कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासन, पोलीस, डॉक्टर आणि इतर कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील संस्था, व्यक्ती हे आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करीत आहेत. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाख 36 हजार 808 रुपयांचा धनादेश जमा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्रा वारभुवन तसेच तारापूर अणू विद्युत केंद्राचे संचालक राजपूत, स्टेशन संचालक मनोज जोशी, कर्मचारी संघटनेचे बुक्कानुरे आदी अधिकारी उपस्थित होते.