महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढवणमध्ये रामदास आठवलेंचा निषेध, वाढवण बंदराला पाठिंब्याची घेतली भूमिका - WADHVAN HARBOUR BUILDUING IN PALGHAR

केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांचा वाढवणमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. रामदास आठवले हे दोन दिवसांपूर्वी पालघरच्या दौर्‍यावर होते यावेळी त्यांनी प्रस्तावित वाढवण बंदराच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. याविरोधात वाढवण येथील मुंडेश्वरीमाता मंदिर टीकेघरपाडा येथे नागरिकांनी एकत्र येत रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला .

WADHVAN HARBOUR BUILDUING IN PALGHAR
वाढवणमध्ये रामदास आठवलेंचा निषेध

By

Published : Jan 7, 2021, 1:22 PM IST

पालघर -केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांचा वाढवणमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. रामदास आठवले हे दोन दिवसांपूर्वी पालघरच्या दौर्‍यावर होते यावेळी त्यांनी प्रस्तावित वाढवण बंदराच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. याविरोधात वाढवण येथील मुंडेश्वरीमाता मंदिर टीकेघरपाडा येथे नागरिकांनी एकत्र येत रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत वाढवण बंदर रद्द करण्याची मागणी केली.

वाढवणमध्ये रामदास आठवलेंचा निषेध


रामदास आठवलेंचा करण्यात आला निषेध
रामदास आठवले हे काही दिवसांपूर्वी पालघरच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रस्तावित वाढवण बंदराच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदरामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल त्याच्यामुळे स्थानिकांनी या वाढवण बंदराला विरोध करू नये अशी भूमिका रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. रामदास आठवलेंनी केलेल्या वक्तव्यांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या विरोधात वाढवण परिसरातील नागरिकांनी मुंडेश्वरीमाता मंदिर, टीकेघरपाडा एकत्र येत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व वाढवण ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा जाहीर निषेध केला. वाढवण बंदर रद्द करावे अशी मागणी यावेळी स्थानिकांकडून यावेळी करण्यात आली.

वाढवणमध्ये रामदास आठवलेंचा निषेध


वाढवण बंदर उभारणीला आठवलेंचा पाठिंबा
देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 65 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा ह्या वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यवसायाला धोका निर्माण होणार अशी माहिती आहे परंतु माझी सर्वांना नम्र विनंती आहे की बऱ्याच वर्षानंतर असा महत्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प होणार आहे. ज्यामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेकांचा यामुळे फायदा होणार असुन दुसरीकडे रस्त्यासाठी 550 एकर जमीन संपादित केली जाणार आहे.त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाढवण काय आहे बंदर प्रकल्प
केंद्रीय नौकानयन व बंदर मंत्रालयाने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारणीचा प्रस्ताव आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर अशी रचना आहे. सदर बंदर बनवण्यासाठी 22 मीटर खोल समुद्रामध्ये पाच हजार एकराचा भराव करावा लागणार आहे.

वाढवणमध्ये रामदास आठवलेंचा निषेध

बंदर उभारणीस स्थानिकांचा विरोध
वाढवण बंदर उभारणीमुळे वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, बाडा पोखरणसह अनेक गावे विस्थापित होणार असून स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार आहेत. वाढवण बंदर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून, येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहे. मच्छीमारी देखील उध्वस्त होऊन जाणार आहे. तसेच 5 हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावे समुद्रात बुडण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत. महाकाय बंदराची व्यापकता, नष्ट होणारी बागायती शेती, किनारपट्टीतील लक्षावधी तिवरीची झाडे, समुद्रातील बीजोत्पादन खडकाळ प्रदेश, मोठ्या मालवाहू बोटीच्या वर्दळीमुळे मासेमारी क्षेत्र संपुष्टात येणार असून परिसरातील जैवविविधता, मासेमारीवर मोठा परिणाम होणार असून या वाढवण बंदर उभारणीला स्थानिक ग्रामस्थांचा आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध केला आहे.

हेही वाचा -मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची दिल्लीकडे कूच, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details