महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सफाळे कोळंबी प्रकल्प चोरी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निलंबित - सफाळे सहायक पोलीस निरीक्षक निलंबन

16 जून रोजी जलसार येथील एका कोळंबी प्रकल्पात टेंभीखोडावे येथील शंभर ते सव्वाशे नागरिकांनी अडीचशे ते तीनशे किलो कोळंबी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 18 जून रोजी खार्डी येथे एका कोळंबी प्रकल्पात 13 ते 14 जणांनी 65 किलो कोळंबी चोरून नेल्याची तक्रार केळवा सागरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पालघर पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आले.

Saphale Caridean Project
कोळंबी प्रकल्प

By

Published : Jun 27, 2020, 4:21 PM IST

पालघर -सफाळे भागातील कोळंबी प्रकल्पांमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांच्यावर या चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी राजू नरावडे यांच्यावर निलंबण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सफाळे कोळंबी प्रकल्प चोरी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक निलंबित

सफाळेच्या पश्चिमेला असलेल्या दातिवरे, खार्डी, जलसार, टेभीखोडावे, वेढी, विळंगी, डोंगरे त्याचप्रमाणे माहीम, केळवे गावालगत सुमारे पाच हजार एकर खारटन जमीन आहे. या क्षेत्रात जवळपास 350 प्रकल्प आहेत. 16 जून रोजी जलसार येथील एका कोळंबी प्रकल्पात टेंभीखोडावे येथील शंभर ते सव्वाशे नागरिकांनी अडीचशे ते तीनशे किलो कोळंबी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 18 जून रोजी खार्डी येथे एका कोळंबी प्रकल्पात 13 ते 14 जणांनी 65 किलो कोळंबी चोरून नेल्याची तक्रार केळवा सागरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

या दोन्ही प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पालघर पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर केळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आत्तापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केळवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details