महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसईत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला 6 हजाराची लाच घेताना पकडले रंगेहात - लाच न्यूज

कश्यप मनोहर शेंडे (वय 42) असे त्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर कॅम्पने ही कारवाई केली.

लाच

By

Published : Nov 21, 2019, 10:58 PM IST

पालघर- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) एजंटचे काम करुन देण्यासाठी त्याच्याकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या वसई तालुक्यातील वालीव शाखेच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहात अटक केली. कश्यप मनोहर शेंडे (वय 42) असे त्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर कॅम्पने ही कारवाई केली.

हेही वाचा -मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाईन फसवणूक, लाखो रुपायांना घातला गंडा

39 वर्षीय तक्रारदार व्यक्ती महावितरणचा एजंट असून त्याने त्याच्या एका ग्राहकाच्या विद्युत पुरवठा भार कपातीसाठी महावितरणच्या वालीव शाखेचा सहाय्यक अभियंता शेंडे याच्याकडे अर्ज केला होता. मात्र, हे काम करुन देण्यासाठी शेंडे याने तक्रारदाराकडे 6 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचला असता सहाय्यक अभियंता शेंडे याला तक्रारदाराकडून 6 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर कॅम्पचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, मदने, पोलीस नाईक सुवारे, पालवे, पोलीस काँस्टेबल सुमडा, मांजरेकर व पोलीस शिपाई दोडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दरम्यान, लाचखोर सहाय्यक अभियंता शेंडे याच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details