वसई-विरार :वसई-विरार महापालिकेतून (Vasai-Virar Municipal Corporation) खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक ( Thane Anti Corruption Department ) कारवाई करीत ४० हजारांची लाच मागणाऱ्या ( Demanded a Bribe of 40,000 ) वसई-विरार महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. वसई-विरार पालिकेतील प्रभाग समिती एफ पेल्हार येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त रुपाली संखे ( Assistant Commissioner in Charge of Pelhar Rupali Sankhe ), ठेका अभियंता हितेश जाधव ( Contract Engineer Hitesh Jadhav ) आणि त्यांच्या साथीदार गणेश झणके ( Accomplice Ganesh Jhanke ) याला सापळा रचून गुरुवारी एसीबीने अटक केली आहे.
पालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर : विरार-वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती पेल्हारच्या साहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये आणि अभियंता हितेश जाधव यांना काल लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे एका दुकानाच्या दुरुस्ती व उंची वाढविण्याचे काम घेतले होते. सदरच्या बांधकामावर कारवाई करून ते निष्काषित न करण्याकरिता पेल्हार विभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये आणि अभियंता हितेश जाधव यांनी सदरील व्यक्तीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत रितसर तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार संख्ये यांनी तडजोडीत 40 हजार रुपये स्वीकारण्याचे ( Bribe of 40,000 ) मान्य केले होते.