पालघर -डहाणू येथे भरधाव कारने नागरिकांना धडक देत हिट अँड रनची घटना शुक्रवारी (दि. 5) घडली होती. या प्रकरणातील आरोपी सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे अखेर निलंबित करण्यात आले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षकांनी ही निलंबनाची कारावई केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या भरधाव कारने नागरिकांना दिली धडक
चिंचणी ते डहाणू प्रवासादरम्यान तारापूर मार्गावर एका भरधाव कारने शुक्रवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास धडक दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही कार चक्क तीन चाकांवर जवळपास 18 किलोमीटरपर्यंत भरधाव चालवत डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात थांबली. यानंतर कार चालक भिंतीवरून पळून गेल्याचे सांगितले जाते. ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या नावावर असून कारमध्ये पोलिसाची टोपीही आढळून आले. भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या एकाची प्रकृती ही अजूनही चिंताजनक असून त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.