महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aryan Khan Drug Case : आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी केळवे पोलिसांच्या ताब्यात - Witness Kiran Gosavi Cordelia Cruise Drug Case

पालघर तालुक्यातील एडवण येथील दोन तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ( Youths deceived for jobs in Palghar ) लाखो रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी ( Kiran Gosavi Aryan Khan Drug Case ) विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केळवे पोलिसांनी रात्री उशिरा किरण गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Kiran Gosavi
किरण गोसावी

By

Published : Dec 2, 2021, 11:04 AM IST

Updated : Dec 2, 2021, 1:10 PM IST

पालघर - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील ( Aryan Khan Drug Case ) वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी ( Kiran Gosavi Cordelia Cruise drugs case) याला केळवे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर तालुक्यातील एडवण येथील दोन तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी गोसावी विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केळवे पोलिसांनी रात्री उशिरा किरण गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.


पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावीने उकळले. उत्कर्ष व आदर्श हे दोन तरुण दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावीची त्यांच्याशी सुरुवातीला फेसबुकवरून मैत्री झाली. उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावीने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावीच्या के.पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व व्हिजा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व व्हिजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही धक्का बसला. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता.

आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने किरण गोसावीला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावीला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात कलम 420,406, 465,467,471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

केळवे पोलिसांनी गोसावीला घेतले ताब्यात -
किरण गोसावी हा पुणे गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील तरुणांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. एडवण येथील तरुणांच्या फसवणूकी प्रकरणी पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Last Updated : Dec 2, 2021, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details