महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चित्रकार शिक्षकाने काढले स्वत:चे शेवटचे चित्र; मृत्यू दिनांक लिहून केली आत्महत्या

गंगाराम चौधरी (वय 31) हे डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथील रहिवासी होते. ते चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. गंगाराम हे वारलीमधील पारंगत चित्रकार होते.

वारली चित्र काढताना गंगाराम चौधरी
वारली चित्र काढताना गंगाराम चौधरी

By

Published : Jul 17, 2020, 5:24 PM IST

पालघर- मन विषण्ण करणारी आत्महत्येची घटना समोर आली आहे. चित्रकाराने स्वत:च्या रेखाटलेल्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहिली व फोटोला हार घातला. त्यानंतर राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे घडली आहे. गंगाराम रमेश चौधरी असे आत्महत्या केलेले शिक्षकाचे नाव आहे.

गंगाराम चौधरी (वय 31) हे डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथील रहिवासी होते. ते चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. गंगाराम हे वारलीमधील पारंगत चित्रकार होते. सध्या शेतीची काम सुरू असल्याने त्यांच्या घरातील सर्व भात लावणीच्या कामासाठी शेतावर गेले होते तसेच दिवसांपूर्वी त्यांची पत्नीही माहेरी गेली होती. त्यांनी 8 जून रोजी गंगाराम यांनी आपले स्वतःचे चित्र रेखाटले होते. या चित्रावर 15 जुलै 2020, बुधवार असा त्यांनी मृत्यू दिनांक व वार लिहिला आहे.

स्वतः च्या हाताने चित्राला हार घालून त्यांनी हा फोटो नातेवाईकाला व्हॉट्सऍपद्वारे पाठविला. यावेळी घरातील सर्व बाहेर गेले होते. घरी एकटेच असलेल्या गंगाराम यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येप्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात आत्महत्येच्या घटनांची संख्या वाढत आहेत. नैराश्य अथवा इतर मानसिक बाबींशी निगडीत समस्यांवर मानिसक समुपदेशन घ्यावे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details