महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्नाळ्यात २३ बांगलादेशी नागरिकांना अटक, एका अल्पवयीन मुलाचा समावेश - anti-human trafficking unit

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना हाकलण्यासाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता.

23 Bangladeshi nationals arrested
अर्नाळ्यात २३ बांगलादेशी नागरिकांना अटक

By

Published : Feb 12, 2020, 12:33 PM IST

Updated : Feb 12, 2020, 12:56 PM IST

पालघर - अर्नाळ्यात २३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. विरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दहशतवाद विरोधी पथक व अनैतिक मानवी वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे. तसेच मनसेनेही बांगलादेशींना पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना हाकलण्यासाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. त्यानंतरच पालघर अनैतिक वाहतूक शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, दहशतवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या मदतीने २३ बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे.

विरार पश्चिम येथील कळंब, अर्नाळा परिसरातून मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून पोलिसांच्या जोडीला उभे राहून कारवाईसाठी मदत केली. यातील काही बांगलादेशी पळून जात असताना मनसेने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील काहींना चांगले मराठीही बोलता येत आहे.

अर्नाळ्यात २३ बांगलादेशी नागरिकांना अटक

हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी पहाटे चार वाजता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -पालिका सभागृहात उंदीर, मग मुंबई कशी स्वच्छ ठेवणार?

कडोंमपात युती तुटल्याने मनसेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर भाजपचा ताबा

आमदार रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस ; राम शिंदेंनी दाखल केली होती याचिका

Last Updated : Feb 12, 2020, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details