पालघर - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा (14 नोव्हेंबर ) दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानामित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिनाचे औचित्य साधून पालघरमध्येही बालकामगार विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.
नेहरु जयंतीनिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती रॅली
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा (14 नोव्हेंबर ) दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानामित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिनाचे औचित्य साधून पालघरमध्येही बालकामगार विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.
ही जनजागृती रॅली पालघर रेल्वे स्टेशन ते पालघर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्यने विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, कामगार उपायुक्त तारापूर व अभिनव शिक्षण संस्थायांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीमध्ये पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव, कामगार उपायुक्त पालघर किशोर दहिफळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बालकामगार विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवायला हवा, असे उपजिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी ही जनजागृती मोहीम पालघरमध्ये सर्वत्र राबविण्यात येणार आहे.