पालघर-जिल्ह्यात यंदाच्या हंगामात 2443 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यांमध्ये 80 ते 95 टक्के पाऊस झाला आहे. पालघर तालुक्यात यंदाच्या हंगामात सर्वाधिक 2786 मिलिमीटर म्हणजे 115 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 106 टक्के पावसाची नोंद - पालघर ताज्या बातम्या
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही परतीचा पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून हा परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या हंगामात 2443 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा 106 टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे वसई तालुक्यात 2721 मिलिमीटर म्हणजे 101 टक्के, डहाणू तालुक्यात 2252 मिलिमीटर म्हणजे 119 टक्के आणि तलासरी तालुक्यात 2267 मिलिमीटर म्हणजे 106 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय विक्रमगड तालुक्यात 2427 मिलिमीटर म्हणजे 94 टक्के, वाडा तालुक्यात 2609 मिलिमीटर म्हणजे 86 टक्के, जव्हार तालुक्यात 2297 मिलिमीटर म्हणजे 85 टक्के, मोखाडा तालुक्यात 1831 मिलिमीटर म्हणजे 81 टक्के इतक्या पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही परतीचा पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून हा परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा सातत्यपूर्ण पाऊस झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत चांगल्याप्रकारे मुरण्यास मदत झाली आहे. अनेक ठिकाणी अति पाऊस झाल्याने देखील भातपिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे, तसेच सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने धरणे, नदी-नाले, तलाव, विहिरी भरल्याचे चित्र आहे.