पालघर - चिंचणी सागरी महामार्गावर बायपासजवळ विचित्र अपघात झाला. दोन कार आणि एक बाईक अशा तीन वाहनांत हा अपघात घडला. अपघातात पाच जण जखमी झाले आहे.
चिंचणी सागरी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; पाच जखमी - चिंचणी सागरी महामार्गावर अपघात
चिंचणी सागरी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात पाचजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बोईसर येथील आनंद रुग्णालयात दाखल केले आहे.
चिंचणी सागरी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; पाच जखमी
जखमींना खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल:-
तारापूर - चिंचणी सागरी महामार्गावर बायपासजवळ दोन कार आणि एक दुचाकी अशी तीन वहाने एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार रस्त्यालगतच्या खाडी क्षेत्रात फेकली गेली. या भीषण अपघात तिन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून यातील दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी बोईसर येथील आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Mar 20, 2021, 4:44 PM IST