महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2020, 7:46 PM IST

ETV Bharat / state

पालघर : ग्रामपंचायत हद्दीत मासळी बाजार हवे, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मागणी

पालघर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत मच्छी मार्केट उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदन देताना
निवेदन देताना

पालघर -जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत मच्छी मार्केट उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना देम्यात आले.

पालघर जिल्ह्याला 112 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यात जिल्ह्यात सागरी, नागरी आणि डोंगरी अशा भौगोलिक परिस्थितीत विभागला गेला आहे. वसई ते डहाणू तलासरीच्या काही सागरी किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात मच्छिमारी चालत असते. यात या मच्छिमारांना हक्काची मासळी बाजारपेठ हवी आहे. तेथे निवारा शेड उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी बंदरात सन 2012 ला तत्कालीन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते राज्य शासन कृषी, पशुंवर्धन विभाग, दुग्ध्यवसाय विकास, मत्स्यवसाय विभाग, राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात सातपाटी येथे मच्छिमारांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा दिनांक 17 मे 2012 रोजी असताना देखील ते काम 8 वर्षे उलटली तरी अजून काम सुरू नसल्याचे ओरड अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितकडून केली जात आहे. मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत निवेदन देण्यात आले.

तसेच पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखानदारीतून रासायनिक सांडपाणी हे समुद्रात सोडले जाते. याचा थेट परिणाम मत्स्यबिज उत्पादनावर होत असतो. त्याला आळा घालावा तसेच येथील शासकीय व खासगी नोकर भरती स्थानिक भूमीपुत्रांना 80 टक्के वाटा द्यावा, अशी मागण्या ही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना सादर निवेदनात केल्या आहेत.

हेही वाचा -पालघर जिल्ह्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details