पालघर- पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर घोडा यांनी राष्ट्रवादीकडून पालघर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अवघ्या दोन दिवसात ते स्वगृही परतले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
.....या कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे - Palghar
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पालघर विधानसभेवर दावा केल्याने मी आपला उमेदवारी अर्ज वापस घेतल्याचे अमित घोडा यांनी सांगितले आहे.

ही बंडखोरी मोडीत काढण्यात शिवसेनेला यश आले आहे. काल सोमवार सकाळपासून अमित घोडांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, घोडा रात्री उशिरा मातोश्रीवर दिसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता काही वेळापूर्वीच अमित घोडा आमदार रविंद्र फाटक आणि शिवसेना कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पालघर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. येथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पालघर विधानसभेवर दावा केल्याने मी आपला उमेदवारी अर्ज वापस घेतल्याचे अमित घोडा यांनी सांगितले.
हेही वाचा-गाडी पार्किंग करण्यावरून वाद ,फाऊंटन हॉटेलवर दगडफेक