महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डहाणू-तलासरी भागातील जवळपास 700 मच्छीमार समुद्रात अडकले - गुजरात

डहाणू तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार समुद्रात अडकले आहेत. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेले मच्छीमार गुजरात मधील उंबरगाव येथे उतरणार होते. मात्र, गुजरात प्रशासनाकडून त्यांना तिथे उतरण्यास नकार देण्यात आला होता.

almost 700 fishermen in the Dahanu-Talasari area are trapped in the sea
डहाणू-तलासरी भागातील जवळपास 700 मच्छीमार समुद्रात अडकले

By

Published : Apr 5, 2020, 10:37 AM IST

पालघर - डहाणू-तलासरी भागातील जवळपास 600 ते 700 मच्छीमार समुद्रात अडकले आहेत. गुजरातमधील पोरबंदर, सौराष्ट्र, वेरावळ या भागात हे खलाशी मच्छीमारीसाठी दरवर्षी जात असतात. मच्छीमारीसाठी गेलेले हे मच्छीमार गुजरातमधील उंबरगाव येथे उतरणार होते, मात्र गुजरात प्रशासनाकडून त्यांना नकार देण्यात आला.

डहाणू-तलासरी भागातील जवळपास 700 मच्छीमार समुद्रात अडकले

हेही वाचा...गंभीर! मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर

यानंतर हे सर्वजण नारगोळ बंदरावर गेले. तिथेही त्यांना विरोध झाल्याने ते पुन्हा गुजरातमधील मरोलीपासून पाच नॉटिकल मैल अंतरावरील समुद्रात विसावले आहेत. आज या सर्व मच्छीमांराची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details