महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

५ हजार वनपट्ट्यांचे आदिवासी विकासमंत्र्यांच्या उपस्थितीत वाटप - वनपट्टा

८ तालुक्यातील प्रत्येकी ५ लाभार्थ्यांना या वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पालघर तालुक्यातील हलोली येथील लक्ष्मण हरी पांढरे आणि  वसई, वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरीच्या लाभार्थ्यांना मंचावर बोलावण्यात आले.

डहाणू येथे ५ हजार वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले

By

Published : Mar 10, 2019, 1:01 PM IST

पालघर - जिल्ह्यात ४४ हजार ३८४ वनपट्ट्यांचे दावे मंजूर करत निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी ५ हजार वनपट्ट्यांचे शनिवारी ९ मार्चला डहाणू येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. ८ तालुक्यातील प्रत्येकी ५ लाभार्थ्यांना या वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पालघर तालुक्यातील हलोली येथील लक्ष्मण हरी पांढरे आणि वसई, वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरीच्या लाभार्थ्यांना मंचावर बोलावण्यात आले.

वनहक्क मान्यता अधिनियम २००६ व २००८ तसेच सुधारित नियम २०१२ नुसार अंमलबजावणी करून वनपट्ट्यांचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबवला. याद्वारे पालघर जिल्ह्यात २९ हजार ५०५ मंजूर मूळ दावे व १४ हजार ८७९ मंजूर अपील दावे असे एकूण ४४ हजार ३८४ दावे निकाली काढले. त्यामध्ये ५५ हजार ९५७ एकर जमीन क्षेत्राचा लाभ वनपट्टे धारकांना होणार आहे. प्रशासनाने २९ हजार १९५ मंजूर दाव्यांची मोजणी केली असून त्यासाठी शासनाला २२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. सामूहिक मंजूर दाव्यांचे ४४१ प्रकरणे निकाली काढल्याने त्याद्वारे ७० हजार ६५३ एकर वनजमीन लाभार्थ्यांना प्राप्त झाली आहे.

डहाणू येथे ५ हजार वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले

यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले, की खावटी कर्ज राज्यातील आदिवासींना लवकरच वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ३६१ कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडून भरण्यात आली आहे. शिवाय वनपट्टे लाभार्थ्यांना या जमिनीतून आर्थिक लाभ व्हावा यासाठी त्यांना विहीर, मोटरपंप आणि फळझाडे विनामूल्य देण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने आदिवासींना वनपट्ट्यांचे वाटप जलदगतीने व्हावे यासाठी मागील ६ महिन्यांमध्ये वनमित्र मोहीम राबवली. त्यामध्ये १४ हजार ५९८ दावे डी.एल.सी.च्या अखत्यारीत हाताळले गेले. यातील ९ हजार ३५७ दावे मंजूर करण्यात आले. त्यापैकी ५७३ दावे हे कातकरी घरठाण लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आले. वनपट्टे दावे दाखल केलेल्या प्रकरणात २ हजार ९३४ वैयक्तिक दावे व ८ हजार ८३८ अपील दावे असे एकूण ११ हजार ७७२ दावे प्रलंबित असून काही दिवसांत सर्व दावे निकाली काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी जाहीर केले.

याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार पास्कल धनारे, विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित, जि. प. अध्यक्ष विजय खरपडे, प्रांत अधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, पंचायत समिती सभापती रामा ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details