महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे आंदोलन - पालघर बातमी

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटनेच्या निषेधार्थ पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Oct 1, 2020, 7:45 PM IST

पालघर -उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटनेने देशाला पुन्हा एकदा हादरवून टाकले असून या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. हाथरस अत्याचाराविरोधात आज (दि. 1 ऑक्टोबर) पालघर येते जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करत भाजप आणि योगी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

आंदोलक
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका 19 वर्षीय तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचे देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. उत्तरप्रदेशात महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांवर अंकुश ठेवण्यात तेथील सरकार अपयशी ठरले आहे. हाथरस घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व उत्तर प्रदेशातील भाजप सरकार विरोधात भारतीय जनवादी महिला संघटनाकडून निषेध मोर्चा निषेध आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details