वाडा (पालघर) - कांदा काही जीवनावश्यक वस्तू बाब नाही. ज्यांना ज्या दरात उपब्धत होईल वा परवडेल अशा किमतीत घ्यावा, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी पालघर भागातील डहाणू तलासरी भागात भूकंप प्रवण क्षेत्रात भेटी दरम्यान व्यक्त केले. तसेच गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांनी कांदा कुठेही विकावा असे असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे, ती उठवावी. तसेच कांदा पिकापासून आता 2 पैसे मिळत असताना हा निर्णय योग्य नाही, असे त्यांनी म्हटले .
कांदा काही जीवनावश्यक वस्तू नाही, परवडेल त्या भावात खरेदी करावे - कृषीमंत्री दादा भुसे - वाडा कांदा निर्यात बंदी बातमी
कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच भेट दिली. भूकंपाने बाधीत झालेल्या घरांची पाहणी केली. सासवद, धुंदलवाडी या भागात भेटी दिल्या. कोविड वेदांत हॉस्पिटललाही यावेळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू व तलासरी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व विशेषता भूकंप याविषयी आढावा बैठक झाली.
कांदा निर्यातीवर बंदी आणल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. हजार ते पंधराशे रुपयावर भाव खाली आले आहेत, असे पालघर जिल्हा पालकमंत्री तथा कृषिमंत्री दादा भुसे यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात भूकंप प्रवण क्षेत्राच्या भेटी वेळी ते बोलत होते.
कांदा निर्यात बंदीवर किसान काँग्रेस आंदोलन करेल, अशी माहिती किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष पराग पष्टे यांनी बोलतना बोलतना सांगितले. पालकमंत्री तथा कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच भेट दिली. भूकंपाने बाधीत झालेल्या घरांची पाहणी केली. सासवद, धुंदलवाडी या भागात भेटी दिल्या. कोविड वेदांत हॉस्पिटललाही यावेळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू व तलासरी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती व विशेषता भूकंप याविषयी आढावा बैठक झाली. सदरची बैठक सासवद येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये घेण्यात आली. यावेळी त्यांनी घराला तडे गेलेले आहेत. त्यांच्या घराला समक्ष भेट देऊन नक्की काय कारणामुळे तडे जात आहेत, याचा अभ्यास केला व त्याबाबत त्यांना सरकारी मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.