महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी कायद्याविरोधात विविध पक्ष, संघटनांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

protest
कृषी कायद्याविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By

Published : Dec 3, 2020, 4:52 PM IST

पालघर - दिल्ली येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासासाठी देशासह राज्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पालघरमध्येही केंद्र सरकारने लागू केलेल्याा नव्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

कृषी कायद्याविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यासर्व पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून हे कायदे मागे घेण्यात यावेत, असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना यावेळी देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनता दल, माकप, कष्टकरी संघटना आदींसह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा -

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या कायद्याविषयी काही शंका आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजप सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे. परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. हे शेतकरी विरोधी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी या आंदोलनाद्वारे विविध पक्षाच्या संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबरपणे उभे असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा -"मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, असे कोणाला वाटत असेल तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही"

हेही वाचा -'एमडीएच' मसाल्यांचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन; जगातील सर्वाधिक वयाचे सीईओ म्हणून होती ओळख..

ABOUT THE AUTHOR

...view details