महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - agitation at palghar collector office

मोखाडा तालुक्यातील प्रस्तावित दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प रद्द करा, अप्पर वैतरणा समोर पाणीपुरवठा योजना मंजूर करा, तालुक्यात पर्याय जल आखाडा तयार करा आणि तालुक्‍यात अस्तित्वात असलेल्या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

palghar
पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By

Published : Feb 11, 2020, 9:00 AM IST

पालघर - कष्टकरी संघटना आणि भू-पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात मोखाडा तालुक्यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. मोखाडा तालुक्यातील प्रस्तावित दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प रद्द करा, अप्पर वैतरणा समोर पाणीपुरवठा योजना मंजूर करा, तालुक्यात पर्याय जल आखाडा तयार करा आणि तालुक्‍यात अस्तित्वात असलेल्या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा. या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोखाडा आणि परिसरातील महिला हजारोंच्या संख्येने डोक्यावर हंडे घेऊन सहभागी झाल्या.

पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मोखाडा तालुक्यातील जनतेची पाणीटंचाई ही सर्वात मोठी समस्या आहे. तालुक्यातील बहुतांश पाडे पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. मार्च-एप्रिल महिना येताच विहीर-बावडी आटायला सुरुवात होऊन पाणीटंचाई भासू लागते. मोजक्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरीही त्यांचा स्रोत हा विहिरीतून असल्याने त्याही उन्हाळ्यात बंद पडतात. डोंगराळ भाग आणि मातीच्या गुणवत्तेमुळे पाणी न मुरता वाहून जाते. त्यामुळे विहिरींचे पाणी हे आपल्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय नक्कीच नाही.

हेही वाचा -'पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला'

यावर उपाय म्हणून कायमस्वरूपी पाण्याचा साठा असणारे मोखाडाजवळ असणारे मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरणातून 1 टक्के पाणी वापरून कमी खर्चात काढायला पिण्याच्या पाण्याची योजना मुंबई आय.आय.टी ने सुचवली होती. जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 20 लाख खर्च करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्यता देऊन त्याच्या आधारावर डीपीआर देखील तयार करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने या योजनेस होकार दर्शवला आहे. मात्र, असे असूनसुद्धा मोखाडा सामुहिक पाणीपुरवठा योजना धूळ खात पडली आहे.

हेही वाचा -आधी पुनर्वसन मगच विस्थापन, गारगाई धरण प्रकल्पग्रस्तांची मागणी

मोखाडा तालुक्यात प्रस्तावित दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प अंतर्गत मोठा खर्च करून शिवा कोरडेची मेट, पुलाचीवाडी, बेडूकपाडा, उधळे, चिंचुतारा या पाच ठिकाणी धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मोखाडा तालुक्यातील सुमारे 3 हजार एकरहून जास्त क्षेत्र पाण्याखाली खाली जाणार असून लोक मोठ्या प्रमाणात विस्थापित होणार आहेत.

हेही वाचा -वाढवण बंदर मंजुरीबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाच्या फलकावर निषेध म्हणून फासले काळे

पाच धरणांमध्ये पाणी साठवून ते वैतरणा धरणांमध्ये सोडण्यात येणार असून, पुढे हे पाणी सिन्नर तालुक्यात औद्योगिकरणासाठी आणि शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. या कारणांमुळे आधीच्या भाजप सरकारने मोखाडा सामूहिक पाणीपुरवठा योजना रद्द करण्याचे ठरवले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. मोखाडा तालुक्यात नदीजोड प्रकल्प सुरु करणे आणि सामूहिक पाणीपुरवठा योजना रद्द करणे, हे आधीच्या भाजप सरकारचे दोन्ही चुकीचे निर्णय बदलण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारकडे करण्यात आली.


प्रमुख मागण्या:-

1. अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना मंजूर करणे
2. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प रद्द करा
3. मोखाडा तालुक्यासाठी पर्यायी जल आराखडा तयार करा
4. अस्तित्वात असलेल्या धरणांच्या (वाघ, खोच तुळ्याचापाडा, सायदे) पाण्याचे नियोजन करा

ABOUT THE AUTHOR

...view details