पालघर - वाडा तालुक्यात संचारबंदीमुळे अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यातील 418 कामगारांसाठी 10 ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, इस्कॉन या माध्यमातून त्यांना अन्नाची सोय केली जात आहे. कोरोनाबाबत कुणी अफवा पसरवली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वाडाचे तहसीलदार उद्धव कदम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
'संचारबंदीत अडकलेल्या 418 कामगारांची 10 कॅम्पमध्ये व्यवस्था, तर अफवा पसरवणाऱ्यांवर करणार गुन्हे दाखल' - ग्रामपंचायत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी लागू करण्झायात आली आहे. त्यामुळे परराज्यातील 418 कामगारांसाठी 10 ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत.
वाडा तालुक्यात 500 हून अधिक कंपन्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे येथे विविध कंपनी क्षेत्रामध्ये काम करणारा परराज्यातील कामगारवर्गाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारी भाजीपाला, मेडिकल दुकाने चालू असून गर्दी टाळता यावी, यासाठी पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन समिती काम करीत आहे.
कोरोनाबाबत कोणी अफवा पसरवत असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजीपाला सोशल डिस्टंसींगने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मिळेल अशी माहितीही कदम यांनी दिली.