पालघर - जिल्ह्यातील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्र उद्यानमध्ये काम करणाऱ्या आदिवासी मजुरांना दीड वर्षपासून वेतन मिळाले नाही. हे वेतन वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाने द्यावे, अशी मागणी आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जणाठे यांनी केली.
हेही वाचा -मोगऱ्यावर पिन बोरर रोगाचा प्रादुर्भाव; मोगरा उत्पादक शेतकरी चिंतेत
मनोर येथील टेन जवळ स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्र, या वनविभागाच्या सामाजिक वनीकरणच्या नर्सरीमध्ये परिसरातील करळगाव, टेन, सावरखांड (धांगड पाडा) या गावतील 45 मजुरांनी काम केले आहे. मात्र, त्यांना दीड वर्षापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर वनविभागाकडून मजुरांच्या पगाराबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप संतोष जनाठे यांच्याकडून करण्यात आला.