पालघर -युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या निमित्त आदित्य ठाकरे यांची पालघरमध्ये सभा पार पडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सचिन अहिर, रवींद्र फाटक, राजेंद्र गावित यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास वनगा यांच्याविषयी प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंनी काढता पाय घतेल्याचे दिसून आले.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा पालघरमध्ये... पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत... पालघर येथील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला सुरुवात झाली.
हेही वाचा... 'तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, त्यावेळी आमचे बापजादे मैला उचलत होते'
जातपात, धर्मभेद सर्व काही विसरून सर्वांनी एकजुट व्हावे - ठाकरे
मला कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषण मुक्त, सुजलाम सुफलाम, सुशिक्षित महाराष्ट्र बनवायचा आहे. हा नवा महाराष्ट्र घडवणे हे एकट्याचे काम नसून यासाठी जातपात, धर्मभेद सर्व काही विसरून सर्वांनी एकजुटीने एकत्र यायला हवे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यायला मी येथे आलो आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
हेही वाचा... धर्माच्या नावाखाली मुस्लीम आता मते देणार नाहीत; आनंदराज आंबेडकरांचा 'एमआयएम'ला टोला
वनगांच्या प्रश्नावर काढता पाय
सभेनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी श्रीनिवास वनगा कुटुंबीयांना शिवसेना आता तरी न्याय देणार का? असा सवाल केला असता, त्यांनी ते आमच्यासोबत आहेत, असे सांगून काढता पाय घेतला.
हेही वाचा... 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'