महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेला  मत न देण्याऱ्यांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न करणार - अदित्य ठाकरे - शिवसेना जनआशिर्वाद यात्रा

पालघर जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रेचा 17 सप्टेंबरला प्रारंभ झाला. नालासोपारा, डहाणू, वाडा या भागात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अदित्य ठाकरे यांनी दौरा केला. या यात्रेत नवा महाराष्ट्र घडवायचा आणि जनसामान्यांची स्वप्नही पूर्ण करायची आहेत. जो आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही, तो आवाज ऐकण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे.

युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे

By

Published : Sep 19, 2019, 7:50 AM IST

पालघर -जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर निघणार नसुन ही यात्रा दरवर्षी निघणार असल्याचे मत युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मत देणाऱ्यांचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले, तर ज्यांनी मत शिवसेनेला दिले नाही त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यावेळी ते म्हणाले. वाडामधील खंडेश्वरी नाका येथे १७ सप्टेंबरला सायंकाळी आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेत ते बोलत होते.

युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे

पालघर जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रेचा 17 सप्टेंबरला प्रारंभ झाला. नालासोपारा, डहाणू, वाडा या भागात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अदित्य ठाकरे यांनी दौरा केला. या यात्रेत नवा महाराष्ट्र घडवायचा आणि जनसामान्यांची स्वप्नही पूर्ण करायची आहेत. जो आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही, तो आवाज ऐकण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा फक्त निवडणुकीपूर्वी नाही आणि नंतरही नाही, अशी यात्रा दरवर्षी काढण्यात येईल. माझ्या एकट्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मुख्यमंत्री आणि आमदार बनण्यासाठी धावलो नाही. आपली स्वप्नही पुर्ण करून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. तो कोणत्या जातीचा आणि धर्माचा महाराष्ट्र बनवायचा नाही. असेही त्यांनी यावेळी नमुद केले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्यांचे आभार या यात्रेतून करतोय. दरम्यानच्या काळात याच भागात शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडून माऊली संवाद यात्रा काढण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details