पालघर -अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून कायम करण्यासाठी महिलेकडून लाचेची मागणी करणाऱ्या, एकात्मिक बालविकास प्रकल्प सेविकेला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजार रुपयांच्या रक्कमेसह रांगेहाथ पकडले आहे. यात वाडा बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे.
21 हजार रुपयांची मागणी
पालघर जिल्ह्यातील वाडा बालविकास प्रकल्पाचे गोरक्ष खोसे यांनी, एका अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या महिलेकडून नोकरीवर कायम करण्यासाठी 21 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे या महिलेने पालघर येथे लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारदारासह लाचलुचपत विभागाकडून त्याची पडताळणी करण्यात आली आहे.