महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डहाणू नगरपरिषदेतील प्रभारी मुकादम निलंबित तर उपमुख्य अधिकारी सक्तीच्या रजेवर - पालघर बातमी

डहाणू नगरपरिषदेत गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नोंदी पेन्सिलने ठेवणे, बिलांमध्ये अफरातफर, स्चच्छतेच्या नियोजनात कामचुकारपणा केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे प्रभारी मुकादम भरत राऊत यांना निलंबित करण्यात आले तर उपमुख्य अधिकारी प्रदीप जोशी यांनी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

dahanu
डहाणू नगर परिषद

By

Published : Jun 8, 2020, 2:44 PM IST

पालघर- डहाणू नगरपरिषदेत गैरहजर असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नोंदी पेन्सिलने ठेवून, नंतर बिलांमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी तसेच शहराच्या स्वच्छतेच्या नियोजनात कामचुकारपणा केल्याबद्दल, डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी आरोग्य विभागाचे प्रभारी मुकादम भरत राऊत यांना निलंबित केले आहे. उपमुख्य अधिकारी प्रदीप जोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

माहिती देताना मुख्याधिकारी अतुल पिंपळे
डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून मे महिन्यात पदभार स्वीकारलेल्या अतुल पिंपळे यांनी 4 जून रोजी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी व वेतनपुस्तक मुख्याधिकारी यांच्याकडून प्रमाणित करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मे 2020 पूर्वीचे हजेरी पुस्तक उपलब्ध नसल्याचे देखील आढळले. मे महिन्याच्या हजेरी व वेतन पुस्तकाची तपासणी केली असता अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या नोंदी पेन्सिलद्वारे करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, पुस्तकात उपस्थितीबाबत व्हाइटनरद्वारे खाडाखोड केल्याचे देखील निदर्शनास आले. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा करणे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणे, गैरप्रकाराबाबत वरिष्ठांना माहिती न करणे, नगरपरिषदेच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानाकडे दुर्लक्ष करणे, असा ठपका उपमुख्य अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी याप्रकरणी आरोग्य विभागाचे प्रभारी मुकादम भरत राऊत यांना निलंबित केले असून उपमुख्य अधिकारी प्रदीप जोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details