पालघर- मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतणाऱ्या एका दुचाकीस्वार जोडप्याच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने अॅसीड फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पालघरमध्ये अज्ञाताचा पती-पत्नीवर अॅसिड हल्ला; पती ठार, तर पत्नी जखमी - namit patil
वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंपाजवळील डिव्हायडर जवळ ते रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अॅसिड फेकले.
दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथील रहिवासी अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (वय ४१ वर्षे) आणि सीमा विश्वकर्मा हे दोघे मंगळवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यावर रात्री अडीच वाजताच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतण्यासाठी निघाले. दरम्यान, वसईमधील वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंपाजवळील डिव्हायडर जवळ ते रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सीमा गंभीर जखमी झाल्या आहेत.
वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. हा अॅसिड हल्ला कोणी केला ? या हल्ल्यामागचा हेतू काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.