पालघर -पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला वसईमध्ये नवे वळण मिळाले. वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. हक्काच्या पैश्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय या खातेदारांनी घेतला आहे.
वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय - पीएमसी बँक वसई घोटाळा
वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. हक्काच्या पैश्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय या खातेदारांनी घेतला आहे.
हेही वाचा - ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान; मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर
मागील काही महिन्यांपासून पैश्यांसाठी खातेदारांची फरपट सुरू आहे. याबाबत संताप व्यक्त करत, सरकारला 'ये कौन से अच्छे दिन' असा प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. बँकेच्या घोटाळ्याचा ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून वसईतील खातेधारकांनी एकत्र येऊन वसई पूर्वतील पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर आंदोलन केले. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला.