पालघर - 'क्यूयुकी डिजीटल मीडिया' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर बंगारा (वय - 42) यांचे दुचाकीच्या भीषण अपघातात निधन झाले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हालोली येथे त्यांच्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या डंपरला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की समीर बंगारा यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 'क्यूयुकी'चे संस्थापक समीर बंगारांचा जागीच मृत्यू - manor police station
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात बाईक रायडिंगसाठी राईडर्स येत असतात. समीर बंगाराही आपली दुचाकी घेऊन बाईक रायडिंगसाठी चेंबूरहून आले होते. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हलोली येथे त्यांच्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात बाईक रायडिंगसाठी राईडर्स येत असतात. समीर बंगाराही आपली दुचाकी घेऊन बाईक रायडिंगसाठी चेंबूरहून आले होते. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हलोली येथे त्यांच्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बंगारा यांचा जागीच मृत्यू झाला. या दुचाकी अपघात प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.
समीर बंगारा हे 'क्यूयुकी डिजिटल मीडिया' या कंपनीचे सहमालक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तसेच जगप्रसिद्ध वर्ल्ड डिस्ने इंडिया लिमिटेड कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते.